करोना विषाणूला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली आहे. आता अनेक मराठमोळ्या कलाकारांनी याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याठी कंबर कसली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडिया अकाउंटवर प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
स्त्रियांमध्ये एचबी कमी असल्यामुळे आणि बाळंतीण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येत नाही. म्हणून इतर महिलांनीही अवश्य पुढे यावं, अशी विनंती सोनालीने केली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनेसुद्धा सोशल मीडिया अकाऊंटवर काही दिवसांसाठी फक्त करोना विषाणू संबंधित गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे घोषित केलं आहे.
View this post on Instagram
यावर फक्त लोकांच्या मदतीसाठी तसेच जागरूकतेसाठी काही पोस्ट करण्यात येणार आहे. तसेच स्वप्नीलने या लढ्यात प्रत्येकाला सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.