राजगुरूनगर -राजगुरूनगर नगरपरिषदेत अपहार केल्याबद्दल सहा जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 31 मे) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.
अमर अशोक मारणे, सुनील सीताराम भालेराव, आशा पंडित पोखरकर, गणेश बाळकृष्ण देवरकर, महेश विष्णू घुमटकर (पाचही जण रा. राजगुरूनगर), काळूराम संभाजी नाइकरे (रा. चास कमान ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर युवराज विरणक यांनी फिर्याद दिली होती.