राज ठाकरेंची आज जाहिर सभा

Madhuvan

मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागत लोकसभा निवडणूकीत भाजपाविरोधात मतदान करा, अशी जाहिरपणे आवाहन करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या, शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याची सभा होत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सभेत “ठाकरी’ भाषेत राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार, याकडे अवघ्या महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांबरोबरच पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. या निवडणुकीत मनसेची अधिकृत भूमिका काय? मनसे आघाडीला पाठिंबा देणार काय किंवा कसे? हे अजून स्पष्ट झालेले नाही. राज ठाकरे यांनी 19 मार्च रोजी घेतलेल्या सभेत ही लोकसभा निवडणूक म्हणजे मोदी-शहा जोडी विरूध्द देश अशीच आहे. देशाच्या प्रगतीची नव्याने सुरूवात करायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा राजकीय पटलावरून नाहीशी होणे आवश्‍यक आहे, असे म्हटले होते.

राज ठाकरे यांचा रोख लक्षात घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस आघाडीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे महाआघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर करणार काय? मनसेच्या कार्यकत्र्यांना आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करण्याचा आदेश देणार काय? याविषयी उत्सुकता आहे. राज यांना महाआघाडीत घेण्यासाठी कॉंग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे राज नेमके कोणत्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.