दोन तासाला एक ट्‌विट

सोशल मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सक्रियता संपूर्ण देशाला माहीत आहे. सध्याच्या निवडणूक हंगामामध्ये म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांचे ट्‌विटस्‌ वाढतच गेलेले दिसताहेत. गेल्या 182 दिवसांमध्ये मोदींच्या ट्‌विटर हॅंडलवरून 2143 ट्‌विटस्‌ केले गेले आहेत. याचाच अर्थ प्रत्येक दोन तासांनी एक ट्‌विट !

ऑक्‍टोबर 2018 ते मार्च 2019 या काळात या हॅंडलवरून भाजपाच्या बीजेपी फॉर इंडिया या ट्‌विटर हॅंडलला सर्वाधिक म्हणजे 31 वेळा टॅग करण्यात आले आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये मोदींनी रोज 16 ट्‌विट केले. ऑक्‍टोबर महिन्यातील एका आठवड्यामध्ये तर मोदींनी सर्वाधिक म्हणजे 239 ट्‌विटस्‌ केले होते. मोदींनी केलेले ट्‌विटस 77 लाख वेळा री-ट्‌विट झाले. 3.24 कोटी लोकांनी त्यांना लाईक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.