Keshav Maharaj At Ram Mandir Ayodhya : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराज हा अयोध्येतील राम मंदिरात पोहोचला. जिथे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने प्रार्थना केली आणि भगवान रामाचे आशीर्वाद घेतला.
खरे तर याआधीही केशव महाराज याने भारतातील अनेक मंदिरांना भेट दिली आहे . आता या क्रिकेटपटूने अयोध्येतील राम मंदिरात प्रार्थना केली आणि हाच केशव महाराज याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज गुरुवारी अयोध्येतील राम मंदिरात पोहोचला. त्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही त्याचे याबाबतचे छायाचित्र पोस्ट केले आहे. यासोबतच केशवने कॅप्शनमध्ये जय श्री राम लिहिले आहे आणि हात जोडलेला इमोजी जोडला आहे. केशव महाराज आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपरजायंट्स संघाचा भाग आहे. एलएसजीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी अयोध्येला पोहोचून प्रभू रामाचे दर्शन घेतले. लखनऊ सुपरजायंट्स 24 मार्च रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना खेळणार आहे.
यावेळी केशव महाराज याच्यासोबत एलएसजीचे प्रशिक्षक जस्टिन लँगर, जॉन्टी रोड्स आणि रवी बिश्नोई हे देखील त्याच्यासोबत होते. ही सर्व छायाचित्रे एलएसजीच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, केशव महाराज हा राम भक्त आहेत. केशव क्रिकेटच्या मैदानात उतरला की सहसा स्टेडियममध्ये ‘राम सिया राम’चे गाणे वाजू लागते.
Lucknow se Ayodhya tak 🙏💙 pic.twitter.com/DWCEQQNXTh
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 21, 2024
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे केले होतं कौतूक…
केशव महाराज याने अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे कौतुक केले होते. त्याने एक व्हिडिओ संदेश जारी केला होता आणि आशा व्यक्त केली होती की यामुळे संपूर्ण मानवतेमध्ये शांतता आणि सौहार्द नांदेल. एवढेच नाही तर सोहळ्याचा व्हिडिओही त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे केशव महाराज याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने भगवान रामावरील त्याच्या भक्तीबद्दल सांगितले. प्रभू रामाच्या भजनाच्या सुरात आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच स्टेडियममध्ये ‘राम सिया राम’ वाजवताना ऐकून बरे वाटते.
भारतीय वंशाचा खेळाडू केशव हा हनुमानाचा भक्त…
दरम्यान, केशव महाराज हा दक्षिण आफ्रिका संघातील भारतीय वंशाचा खेळाडू मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहे. त्याचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. या आफ्रिकन खेळाडूचे भारताशी खास नाते आहे. केशव महाराजाचे पूर्वज 1874 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत मजूर म्हणून गेले होते. पुढे त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले.
केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेत राहूनही आपल्या हिंदू प्रथा सोडलेल्या नाहीत. तो पूर्णपणे हिंदू धर्माचे पालन करतो. तो हिंदू देवदेवतांची पूजाही करतो. त्यामुळेच त्याच्या बॅटवर ओम लिहिलेले दिसते. त्याच्या बॅटवर ओमचे स्टिकर अनेकदा दिसून येते. इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा त्याला भारतात येण्याची संधी मिळते तेव्हा तो येथील मंदिरात जातो आणि दर्शन घेतो. केशव हा हनुमानाचा सच्चा भक्त असल्याचे म्हटले जाते.