MPSC Exam Update : लोकसभेच्या निवडणुकांमुळे एमपीएससीने आपलय आगामी परीक्षांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. एमपीएससीने एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
लोकसभेच्या आगामी निवडणूका लक्षात घेता एमपीएससीने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नहे म्हणून असा निर्णय घेतल्याचे समजते. एमपीएससीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत पोस्ट देखील केली आहे. | MPSC Exam Update
आपल्या पोस्टमध्ये एमपीएससीने म्हंटले आहे. “जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.” | MPSC Exam Update
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/gob0HwVPSx
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 21, 2024
पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा यथावकाश जाहीर केल्या जाणार आहेत. | MPSC Exam Update