Raj Kumar Chabbewal । लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. आमदार राजकुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. चब्बेवाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत आप राजकुमार चब्बेवाल यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
काँग्रेसचे आमदार राजकुमार चब्बेवाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यांना होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. आम आदमी पक्षाने गुरुवारीच आठ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.
नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रतिक्रिया Raj Kumar Chabbewal ।
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजकुमार चब्बेवाल यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत, “कुछ तो रही होंगी उनकी मजबूरियां, यूहीं कोई बेवफा नहीं होता. किरदार का मुश्किल वक्त में ही पता लगता है.” असे म्हटले आहे.
यासोबतच नवज्योत सिंग सिद्धू यांनी, “लोक जर पक्ष सोडत असतील तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांचा काय दोष आहे. हे लोक पदासाठी इकडे तिकडे जात आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग पक्षात नसतील तर त्यांच्या पत्नी प्रनीत कौरचे काय. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या माजी आमदारांनीही पक्ष सोडला Raj Kumar Chabbewal ।
याआधी फतेहगढ साहिबचे माजी आमदार गुरप्रीत सिंह जेपी यांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 9 मार्च रोजी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. 14 मार्च रोजी फतेहगढ साहिबमधून लोकसभेचे तिकीट मिळवले.
हेही वाचा
पंजाबमधील ५ मंत्र्यांना आपने दिली उमेदवारी