Lok Sabha Election 2024 । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी यांनी नाराजी दर्शवली आहे.
शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महायुती सरकार यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी मधील फूट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडकीच्या तोंडावर बदलतांना दिसत आहे.
अशात गुरुवारी भाजप पक्षावर आरोप करत शिंदे गटाचे नेत्यांनी राजीनामा दिला.भाजप पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली. माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. येथून शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं दर्शवल होत.
तर दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. त्यांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी मतदारांना भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार करीत आहेत. शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना धडा शिकवा, असं आवाहन केलं होते. अशातच असीम सरोदे यांनी निर्भय बनो सभेत मोठा दावा केला आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले असीम सरोदे
शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते परत येण्यास इच्छुक आहे. लवकरच ते परत येतील, असं सांगताना असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
हे वाचले का ? एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेतील हा नेता ‘भावी मुख्यमंत्री’; वाचा