solar eclipse effects on animals । चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या संपूर्णपणे भौगोलिक आणि नैसर्गिक घटना असल्याने या कालावधीमधील विविध नैसर्गिक घटनांचा अभ्यास करण्याची संधी संशोधकांना उपलब्ध होते.
यावेळी एका महिन्याच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पहायला मिळणार असल्याने संशोधकांचा उत्साह वाढला आहे 8 एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण होणार आहे.
त्याच्या निमित्ताने खग्रास सूर्यग्रहणाचा प्राण्यांवर काय परिणाम होतो याचा खास अभ्यास करण्यात येणार आहे खग्रास सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये भरदिवसा काही काळ अंधार होतो त्यामुळे प्राणी काही काळ गोंधळात पडतात आणि त्यांच्या मनस्थितीवरही त्याचा परिणाम होतो.
त्याचा अभ्यास या निमित्ताने केला जाणार आहे अमेरिकेत आणि इतर अनेक ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण संपूर्णपणे दिसणार असल्याने अमेरिकेतील संशोधकांसाठी ही पर्वणी मानली जात आहे अमेरिकेत जेथे सार्वजनिक प्राणी संग्रहालय आहेत.
त्या ठिकाणी संशोधक लक्ष ठेवून असणार आहेत खग्रास सूर्यग्रहण पूर्ण झाल्यावर जेव्हा काही काळ अंधार असेल तेव्हा प्राण्यांची मनस्थिती काय असेल याचा अभ्यास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे 2017 मधील सूर्यग्रहणाच्या वेळेस सुद्धा असा अभ्यास करण्यात आला होता.
पण यावेळी शास्त्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे आणि पुन्हा एकदा अशी संधी उपलब्ध होण्याची शक्यता दीर्घकाळ कमी असल्याने शास्त्रज्ञांनी यावेळी जोरदार तयारी केली आहे 2017 मध्ये झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी प्राण्यांनी ज्या प्रकारे वर्तणूक केली होती त्याची तुलना यावेळच्या खग्रास सूर्यग्रहणाच्या कालावधीत केली जाणार आहे संशोधकांना संशोधनासाठी खूप कमी कालावधी उपलब्ध होणार आहे पण जो उपलब्ध होणार आहे त्याचा योग्य उपयोग करून घेतला जाणार असल्याची माहिती युनिव्हर्सिटी ऑफ टेनिस मधल्या संशोधक जेनिफर सुरूदा यांनी दिली.