सलग तिसऱ्या दिवशी शहरात पावसाची हजेरी

अवकाळी पाऊस ः अचानक आगमन, नागरिकांची धांदल

पिंपरी – सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने पिंपरी-चिंचवडकरांना ओले चिंब केले. सोमवारी सायंकाळी अचानक कोसळू लागलेल्या पावसांच्या सरींनी नागरिकांची धांदल उडवली. गेल्या दोन दिवसांप्रमाणे सोमवारी देखील सकाळपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. सोमवारी गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारी आणि रविवारी सूर्य मावळल्यानंतर पाऊस येत होता. परंतु सोमवारी मात्र पावसाने थोडे लवकर आगमन केले.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानकच जोराचा पाऊस सुरू झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी पडलेल्या पावसाचा वेगही अधिक होता आणि थेंबही टपोरे होते. ऊन्हात पडत असलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवून दिली. पुढील दोन दिवस पावसाची दाट शक्‍यता हवामाने खात्याने वर्तविली आहे.

राज्यभरात ठिक-ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. दिवसभर उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण होत असताना सायंकाळच्या सुमारास पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने नागरिकांना थोड्या वेळापुरता दिलासा मिळत असला तरी काही वेळाने मात्र पुन्हा उकाडा जाणवत आहे. पावसामुळेशहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.