मुंबई : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलं. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केला आहे. आज शेवाळे यांनी या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे आरोप केले.
पत्रकार परिषदेमध्ये शेवाळे यांनी, उद्धव ठाकरे यांनी मला या प्रकरणी मदत केली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. याबाबत राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना शेवाळेंना आव्हान दिलं आहे.
राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे!”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. “राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे”, असंही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
एकीकडे राहुल शेवाळे म्हणतात की या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ राहुल शेवाळे यांनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवाल रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सदरची महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेनं फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्या असल्याचेही शेवाळे म्हणाले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याबाबत लक्ष घालण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितले होते. याप्रकरणी मला उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचे शेवाळेंनी सांगितले.
शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकतर्त्यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. युवा सेना प्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्या असल्याचे म्हणत शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. या महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे म्हणाले.
सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचेही शेवाळे म्हणाले. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची NIA च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळेंनी सांगितले. संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले.
माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरूंगात गेली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. आरोप करणारी महिला बार डान्सर आहे. या महिलेला ठाकरे गटातील नेत्यांची फूस आहे. मी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझी बदनामी सुरु असल्याचं शेवाळेंनी सांगितले. संसदेत मी AU नाव घेतल्यानं माझ्याविरोधात कट रचला आहे. युवासेना प्रमुखांचा माझ्याविरोधात कट असल्याचा आरोपही राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केला. बंड केल्यानंतर प्रकरण उकरून काढलं असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.