मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शनिवारी (24 डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसलं तरी तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार ‘शीजानशिझान खान’ला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
TV actor Tunisha Sharma death case: Tunisha Sharma’s co-star & accused Sheezan Khan sent to 4-day police custody by Vasai court in Mumbai. pic.twitter.com/0y55NcQ2LC
— ANI (@ANI) December 25, 2022
मात्र, आता आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शीजान मोहम्मद खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीजानला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शीजानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मृत्यूनंतर तुनिषाचा मृतदेह रात्री उशिरा मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला होता. 4 ते 5 डॉक्टर तिच्या शवविच्छेदनच्या वेळी उपस्थित होते. या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी तयार करण्यात आली आहे. तिचं शव हे रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदना नंतर तिचे शव हे कुटुंबियांना देण्यात येईल. त्यानंतर तुनिषा शर्मावर उद्या अंत्यसंस्कार होती. तिची काकू परदेशात राहत असल्याने तिला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आज होणारे अंत्यसंस्कार उद्या किंवा परवा होणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.