Rahul Narvekar – लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून यासाठीची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर जे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, ते ही कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत.
विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले पाहायला मिळत आहेत. । Rahul Narvekar
अशातच आता नार्वेकरांनी दक्षिण मुंबई लोकसभेतून भाजपाचाच खासदार होईल, असे म्हणत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर हे दोन दिवस वरळी विधानसभेत वॉर्डनिहाय दौरा करणार आहेत.
आज त्यांनी वॉर्ड क्रमांक 195 ला भेट दिली. यावेळी त्यांनी या वॉर्डमध्ये असलेल्या वरळी कोळीवाडा झोपडपट्टीला भेट दिली. ज्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत वॉर्डमधील समस्यांविषयी आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच, ज्याप्रमाणे ते त्यांनी त्यांच्या कुलाबा मतदारसंघात काम केले आहे, त्याचप्रमाणे ते वरळी विधानसभेतही काम करणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. तसेच, नार्वेकरांनी वरळी विधानसभेचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका देखील केली. । Rahul Narvekar