Anant-Radhika Wedding : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा 3 दिवसीय विवाहपूर्व सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला जाणार आहे. यासाठी जामनगर येथील रिलायन्स ग्रीन येथे (दि.1 ते 3 मार्च) या कालावधीत भव्य संगीत महोत्सव होणार आहे.
अनंत अंबानी उद्योगपती वीरेन मर्चंटची (businessman Viren Merchant) मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्न करणार आहेत. त्यांचे लग्न या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक आहे.
जामनगर, गुजरातमध्ये भव्य कार्यक्रम –
जामनगर येथील रिलायन्स टाऊनशिपमध्ये प्री-वेडिंगचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये मोठ्या संख्येने बॉलीवूड स्टार, क्रिकेटर्स, बिजनेसमन, राजकीय नेते, विदेशी बिजनेसमन यांसह अनेक सेलिब्रेटी येणार आहेत. पाहुण्यांसाठी हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत आणि बहुतेक पाहुण्यांना रिलायन्स टाउनशिपमध्येच राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.
बॉलीवूड स्टार आणि क्रिकेटर्स मुंबईहून विमानाने जामनगरला पोहोचतील, तेथून त्यांना रिलायन्स टाउनशिपमध्ये नेले जाईल. अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. त्यापूर्वी जानगरमधील अंबानी इस्टेट येथे 1 ते 3 मार्च असे तीन दिवस प्री-वेडिंगचे आयोजन करण्यात येणार आहे.
जगभरातून येणार पाहुणे –
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला जामनगरमध्ये आंतरराष्ट्रीय पाहुणेही येणार आहेत. त्यामुळे जामनगर सजले आहे. इतकंच नाही तर मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलियामध्ये पारंपारिक कार्यक्रमही होणार आहे. मात्र माध्यमांना त्यापासून दूर ठेवले जाईल. उल्लेखनीय आहे की अनंत आणि राधिकाचा साखरपुडा 2022 मध्ये राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात झाला होता.
जामनगरशी अंबानी कुटुंबाचे जुने नाते –
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन गुजरातमध्ये 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या फंक्शनमध्ये अरिजित सिंग, प्रीतम असे बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार आहेत. प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगर शहर निवडण्यामागे एक खास कारण आहे, अंबानी कुटुंबाचा या शहराशी दीर्घकाळ संबंध आहे. जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाचे जुने निवासस्थानही आहे.