नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं निवासस्थान रिकामे केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
12, तुघलक लेन या शासकीय निवासस्थानात राहुल गांधी वास्तव्यास होते. हा बंगला राहुल गांधींना खासदार म्हणून देण्यात आला होता. मात्र खासदारकी गेल्यामुळे त्यांचं घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.
चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बरेच सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवले होते. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचे शिफ्टींग देखील केलेआहे. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.
राहुल गांधी यांनी 14 एप्रिलला बंगल्यातून त्यांचे कार्यालय हलवले. काल (शुक्रवारी) संध्याकाळी त्यांनी शेवटचे शिफ्टींग केले आहे. तर राहुल गांधी 12 तुघलक लेन या शासकीय बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला लवकरच परत करणार आहेत.