नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आज गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात . मात्र, पक्षाच्या सूत्रांनी त्यांच्या लडाख दौऱ्याचा कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी लेहला पोहोचल्यानंतर राहुल गांधी संध्याकाळी लडाख प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यासोबतच लडाखमधील सद्यस्थिती आणि राज्यात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत कारगिल काँग्रेसचे अनेक प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. राहुल गांधी लेहमध्ये काँग्रेसच्या सभांना संबोधित करतील, ज्यामध्ये लडाखच्या लोकांच्या समस्यांवरही चर्चा केली जाईल.