हंबानटोटा :- अफगाणिस्तान संघाला पाकिस्तान विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला. मात्र, त्यातही अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजने वादळी शतक फटकावले. या शतकाच्या जोरावर गुरबाजने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
गुरबाजने 151 चेंडूत विक्रमी 151 धावा केल्या. या खेळीत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. याआधी इतर कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने पाकिस्तान विरुद्ध 150 धावांचा टप्पा गाठला नव्हता.
धोनीने 2005 साली विशाखापट्टणम येथे पाकिस्तान विरुद्ध यष्टीरक्षक म्हणून 148 धावांची खेळी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती, जी आता गुरुबाजने आपल्या नावावर केली आहे.