मुंबई : सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे. तर, ‘पुष्पा द राइज’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 68.19 कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच, दि. 7 जानेवारीला ‘पुष्पा द राइज’ अॅमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय.
He’ll fight. He’ll run. He’ll jump. But he won’t succumb! 💥
Watch #PushpaOnPrime, Jan. 7
In Telugu, Tamil, Malayalam and Kannada@alluarjun #FahadhFaasil @iamRashmika@Dhananjayaka #Suneel #AjayGhosh #RaoRamesh @OG_Jagadeesh @ShatruActor @anusuyakhasba #Sritej #MimeGopi pic.twitter.com/lVxoE7DJSs— amazon prime video IN (@PrimeVideoIN) January 5, 2022
अॅमेझॉन प्राईमने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून माहिती दिली आहे. “तो लढेल..तो धावेल…तो उडी मारेल…पण तो झुकणार नाही. 7 जानेवारी रोजी हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.’ या आशयाचे ट्विट करण्यात आले आहे.
‘पुष्पा द राइज’ चित्रपटाची सरासरी कमाई…
पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई – 26.89 कोटी, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने – 20.20 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन होते – 212.10 कोटी रुपये (5 दिवस).
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना इतकी भावली की कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अभिनेता यशच्या ‘केजीएफ’लाही मागे टाकले आहे.