सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदरच्या दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरलेल्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर सौरऊर्जा सविस्तर प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 कोटी रूपयांची तरतूद केली असून याबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शासनाकडे वेळोवेळी या योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी केली होती, या मागणीला यश मिळाले आहे.
शासनाने पुरंदर उपसा योजनेवर सौरऊर्जा सविस्तर प्रकल्प उभारण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर सौरऊर्जा प्रकल्प होणार असल्याने योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन याचा जास्तीत जास्त लाभक्षेत्राला फायदा.
योजना सर्वसमावेशक होण्यास मदत होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, माहूर आदी पाझर तलावांतून पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही सौरऊर्जा प्रकल्पासाठी आमदार संजय जगताप यांनी मागणी केली आहे.
वस्ताद लहुजी साळवेंच्या स्मारकासाठी निधी द्या
अनेक स्वातंत्र्यसैनिकांना घडविणारे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या पेठ नारायणपूर गावचे सुपुत्र वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उचित स्मारका उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार संजय जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.