चंदीगड– चंदीगड महापालिकेत आम आदमीपक्षाच्या नगरसेवकांना प्रवेश करण्यास आज पोलिसांनी रोखले आहे. त्यामुळे नगरसेवक आप कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार वाद झाला. दरम्यान महापेौर पदाच्या निवडणुकीत भाजपने हेराफेरी केल्याचा आरोप करीत काही आप नगरसेवकांनी महापालिकेच्या दारावरच उपोषण सुरू केले होते. पण त्यांनाही पोलिसांनी तेथून उचलले आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सनी अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि महापौर निवडणुकीदरम्यान बॅलेट पेपरमध्ये “छेडछाड” केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.नगरसेवकांना महापालिकेत जाण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार असताना आम्हाला तेथे जाण्यापासूनच मनाई केली जात आहे याबद्दल आम आदमी पक्षाच्या नगरसेविका प्रेम लता यांनी तीव्र संताप व्यक्त केला.