Punjab AAP: आम आदमी पार्टीने पंजाबमधील ब्लॉक इन्चार्ज आणि सर्कल इन्चार्जची सर्व पदे तत्काळ रद्द करण्यात आली आहेत. लवकरच संस्थेचा विस्तार होऊन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात पंजाबमध्ये तीन लोकसभा मतदारसंघ प्रभारी आणि नऊ जिल्हा प्रभारी नियुक्त करण्यात आले.
राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक, मुख्यमंत्री भगवंत मान आणि प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष बुद्ध राम यांनी यादी जाहीर करण्यात आली. यादीनुसार, दीपक बन्सल यांना लुधियाना लोकसभा मतदारसंघातून, अश्वनी अग्रवाल यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातून आणि जगदेव सिंह बम यांना फिरोजपूर लोकसभा मतदारसंघातून प्रभारी बनवण्यात आले आहे.
आम आदमी पार्टी पंजाब राज्य के सभी ब्लॉक इंचार्ज और सर्किल इंचार्ज के पदों को तुरंत प्रभाव से भंग करती है।
जल्द नए पदाधिकारियों की नियुक्ति की जाएगी । pic.twitter.com/TEYC7c49Wx
— AAP Punjab (@AAPPunjab) October 14, 2023
त्याचबरोबर नऊ जिल्ह्यांचे प्रभारीही करण्यात आले. या यादीत ज्यांना जिल्हा प्रभारी आणि लोकसभा प्रभारी बनवण्यात आले, त्यापैकी बहुतांश व्यक्ती हे पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्षाशी संबंधित असून त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात ‘आप’ने पक्ष संघटनेची जबाबदारी अनेकांवर सोपवली होती. आम आदमी पार्टीने बुधराम यांना पंजाबचे कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले होते. बुधराम हे पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. मानसा जिल्ह्यातील बुधलाडा विधानसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान हे पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्यामुळे पक्षाने कार्याध्यक्ष नेमला होता. याशिवाय चार प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि युवासेना अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली.