महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या स्पर्धेत पुण्याच्या आर्य डोंगरे या स्पर्धकाने बाजी मारली आहे. स्पर्धेच्या विविध फेऱ्या पार करत “टॉप 8’मध्ये आर्यची निवड झाली आहे.
View this post on Instagram
सोनी मराठी या वाहिनीवरील “रिऍलिटी शो’मध्ये आर्य डोंगरे याने नुकतीच “टॉप 8’पर्यंत मजल मारली आहे. मूळचा पुण्याचा असणारा आर्य ओंकार शिंदे यांच्या ओम ऍकॅडमीचा विद्यार्थी असून, सध्या तो नृत्यप्रशिक्षक म्हणून देखील काम करतो.
View this post on Instagram
नृत्याच्या खास आणि प्रभावी शैलीने आतापर्यंत रसिकांसह परीक्षकांचीही मने जिंकली आहेत. स्पर्धेत विविध प्रकारांतील नृत्य सादर करणाऱ्या आर्यचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
“टॉप 12′ ते “टॉप 8′ हा प्रवास अतिशय खडतर होता. 2 वेळा “डेंजर झोन’मध्ये येऊनही बॅटल जिंकून “टॉप 8’मध्ये आल्याचा अभिमान वाटतो आहे. स्पर्धेच्या विविध थीमवर नृत्यप्रकार करण्यासाठी सध्या सर्वच स्पर्धक तयारी करत आहोत.
View this post on Instagram
यापुढे देखील विविध नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा आणि “महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा किताब पटकावण्याचा मानस आहे. लहानपणापासून मी नृत्याचे शिक्षण घेत असून, माझे गुरू ओंकार शिंदे यांचाही सार्थ अभिमान असल्याचे आर्यने सांगितले.