बंगळुरू – कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमारचे वयाच्या 46व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्याच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना चालगांच धक्का बसला आहे. अभिनेता पुनीतच्या निधनाची वार्ता कळताच एका चाहत्याने आत्महत्या केली आहे तर दोन चाहत्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.
30 वर्षीय मुनिअप्पा असे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या एका चाहत्याचे नाव आहे. मुनिअप्पा या तरुणास अभिनेता पुनीतच्या निधनाची बातमी टीव्हीवर पाहत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मुनिअप्पा कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील मरूर गावात वास्तव्यास होता.
राहुल गाडीवड्डारा असे दुसऱ्या चाहत्याचे नाव असून तो बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथे वास्तव्यास होता. राहूलने अभिनेता पुनीतच्या निधनाची बातमी कळाल्यावर गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी राहूलने पुनीतचा फोटो फुलांनी सजवला आणि नंतर गळफास घेतला.
सतीश नामक वय 30 असे उडुपी जिल्ह्यातील साळीग्राम मध्ये राहणाऱ्या तिसऱ्या चाहत्याचे नाव असून सतीश यांना पुनीतच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांनी रिक्षावर जोरात आपटला. त्यामुळे त्यांना मोठी जखम झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्याचे कळाल्यावर त्यास रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात पुनीतच्या मृत्यूची बातमी बघत असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.