पुणे – बीएमडब्यू दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल समोर गुरुवारी घडली. याप्रकरणी अक्षय महादेव एकडे (25,रा.मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) याला चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
रिना सिताराम मुंडे उर्फ रिना सचिन मडके (32,रा.मॉडेल कॉलनी , शिवाजीनगर ) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
पोसिलांनी दिलेल्या माहितीनूसार रिना या झोपडपट्टी पुर्नवसन (एसआरए) या शासकीय संस्थेत कामाला आहेत. त्या पायी जात असताना भरधाव वेगातील अक्षयच्या दुचाकीची त्यांना धडक लागली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.
अक्षयने त्यांना प्रथम एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय ने शिक्षण पुर्ण केल्यावर शेअर मार्केटचे कामकाज सुरु केले आहे. तो मुळचा बुलढाण्याचा आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.