मांजरी –सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर जनतेसमोर यावे आणि पुणे शहराच्या विकासात कोणी किती भर घातली ते सांगावे. गेल्या 50 वर्षांत त्यांना जे जमले नाही ते व त्याहीपेक्षा जास्त काम आम्ही 5 वर्षांत करून दाखवले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
शेवाळेवाडी येथे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे तीन हजार नागरिकांना हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड व युनिव्हर्सल कार्डची नोंदणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही नागरिकांना याचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार राहुल कुल, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक मारूती तुपे, जीवन जाधव, डॉ. बाळासाहेब हरपळे, शिवराज घुले, आण्णा धारवाडकर, अमित घुले, धनंजय कामठे, संदीप हरपळे, गजेंद्र मोरे, डॉ. दादा कोद्रे आदीसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील शेवाळे, शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले. अविनाश कोद्रे यांनी आभार मानले.