सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्रामध्ये दिनांक २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे वगनाट्य आयोजित करण्यात आले आहे. “कुनाला कुनाचा मेळ नाही” अशा शिर्षकाच्या ह्या वगनाट्याचे ललित कला विभागाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरण चालू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भारतीय शास्त्रीय संगीत (गायन, वादन), नृत्य (कथक, भरतनाट्यम) आणि नाट्य या विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर हे पूर्णवेळ गुरूकुल पध्दतीने अभ्यासक्रम चालवले जातात. गुरूकुल पध्दतीचा अंर्तभाव करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. कलात्मक वातावरण व्यावसायिक प्रशिक्षण देत चांगले कलाकार घडवत कला परंपरेचे जतन करणे हे ललित कला केंद्राचे उद्दीष्ट्ये आहे.
दिनांक २० ते २३ फेब्रुवारी रोजी या वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे. या वगनाट्याचे लेखन व्यंकटेश माडगूळकर, दिग्दर्शन अजित साबळे यांनी केले आहे.
वगनाट्याचे नाव – कुनाचा कुनाला मेळ नाही
सादरीकरण- दि. २० ते २३ फेब्रुवारी, सायं ६.३० वा.
स्थळ- वाहनतळ, ललित कला केंद्र परिसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
प्रवेश शुल्क – ५० रूपये.
–
भारती उबाळे,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय