चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजप प्रवेश

तामिळनाडू – कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा होऊन दीड दशक झाला असला तरी त्याचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. या कुख्यात वीरपन्नचा ऑक्‍टोबर रोजी खात्मा करण्यात आला.आता वीरपन्नची मुलगी विद्याराणीने भाजपत प्रवेश केला आहे. विद्याराणी या वकील आहेत. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.


दरम्यान,विद्याराणी यांच्याबरोबर त्यांच्या हजारो समर्थकांनीही भाजपत प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी कृष्णनगर येथे भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या सामील झाल्या होत्या. या वेळी माजी केंद्रीय मंत्री राधाकृष्णन हेही उपस्थित होते. यावेळी जनतेला संबोधित करत विद्याराणी म्हणाल्या, ‘गरजवंतांसाठी आपण कार्यरत राहू, माझ्या वडिलांचा मार्ग चुकीचा होता. पण ते नेहमी गरिबांबाबतच विचार करत असत.’ असेही त्या म्हणाल्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.