सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या गाण्याचा धुमाकूळ
पुणे – इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन इंदोरीकरांच्या चांगल्याच अडचणी वाढल्या.
दरम्यान, आता इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ तरुणाई पुढे सरसावली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक क्रेझ असणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर एक नवीन गाणं काढण्यात आलं आहे. “ताई, आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर” असं हे गाणं आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या निषेधासाठी आणि इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ हे नवीन गाणं तयार करण्यात आलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच टिकटॉक या प्रसिद्ध अॅपवरही तरुणाईने इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.