कोथरुड चांदणी चौकातील प्रकार
कोथरुड – चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तींकडून 4 महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी समोर आला. या बाळाला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे. एका झाडाखाली कापडामध्ये गुंडाळून ते सोडून दिले होते. याबाबत श्रीकांत गोरे यांनी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील यांना माहिती दिली.
दगडे त्याचबरोबर चांदणी चौकात असणारे वाहतूक पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. दगडे यांनी कोथरुड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पाऊस असल्याने गाडीतून बाळाला कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.