पुणे : ड्रेनेज साफ करण्यासाठी घेतले तब्बल 82 हजार; ‘अशी’ केली फसवणूक

महापालिकेचा कर्मचारी असल्याचा केला बहाणा

पुणे- चोकअप झालेले ड्रेनेज साफ केले नाही तर महापालिकेकडून दंड आकारला जाईल अशी भिती दाखवत एका रहिवाशाकडून तब्बल 82 हजार उकळण्यात आले. तसेच त्यांच्या शेजारी रहाणाऱ्यांकडूनही साडेसतरा हजार रुपये घेण्यात आले. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुराग अनिरुध्द केळकर(20,रा.गंगा निवास, भारतकुंज सोसायटी, एरंडवणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार संदिप चव्हाण नावाच्या व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अनुराग घरी असताना, आरोपी संदिप तेथे आला होता. त्याने महापालिकेतून आल्याचे सांगितले. यानंतर तुमचे ड्रेनेज चोकअप झाले असून त्याचे काम करावे लागेल, नाहीतर महापालिका दंड आकारेल अशी भिती घातली.

यानंतर मी ड्रेनेज साफ करुन देतो असे सांगत मशिनव्दारे सफाई करण्यासाठी वेळोवेळी फिर्यादी अनुराग आणि त्याच्या आजोबांकडून 82 हजार रुपये घेतले. तसेच त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या अरविंद सहस्त्रबुध्दे यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक करुन साडेसतरा हजार उकळले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप साळवे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.