पुणे – खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला आणि पानशेत धरणातून सुरू असलेला विसर्ग मंगळवारी बंद करण्यात आला. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 98 टक्के म्हणजे 28.41 टीएमसी इतका आहे.
मागील दोन दिवसांपासून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा येवा कमी झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 428 क्युसेकने सोडण्यात येणारा विसर्ग मंगळवारी बंद करण्यात आला आहे. तर पानशेत धरणातून पॉवरहाऊसद्वारे सोडण्यात येणारा 600 क्युसेक विसर्गदेखील बंद करण्यात आला आहे.