पुणे – उप-मुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव तसेच या सेवा काळात ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना पोलीस दलात नेमणूक पत्र त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असतांना कोरोनाच्या दुस-या लोटेत कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या अंमलदाराच्या तीन पाल्यांना अनुकंपातत्वावर नियुक्तपत्र देवून पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये सामेश संतोष म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांचा समावेश आहे.
तसेच त्यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात चांगली कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरिक्षक, विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक, गौरव देव, सहा.पोलीस निरीक्षक, सुहास टिळेकर, पोलीस नाईक, उत्तम गाडे, गौरव कांबळे, शिपाई रेणुका भांगरे यांचा समावेश आहे.
पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथील नुतनीकरणच्या वेळी चांगली कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मांढरे, संजय साबळे,पोलीस अंमलदार राजुदास जाधव, गणेश गवळी,अवधुत उकरंडे,संदिप मावळे,जगदिश कस्तुरे तसेच सदर नुतणीकरण करणारे ठेकेदार सोैरभ सातपुते,पुष्कराज खराटे,श्री.केवल चव्हाण यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी केले.
पुणे पोलिसांच्या बदली सॉफ्टवेअरचे अजित पवारांकडून कौतुक
अजित पवार यांच्या हस्ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर बदली सॉफ्टवेअरचे कार्यपध्दती विषयी माहिती घेवून सदर ऍपचे कौतुक केले.
बदली सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीयदृष्टया परंतु पारदर्शकपणे मनासारखी बदली मिळण्यास मदत होणार आहे. या ऍप मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नाव, पदनाम, त्यांचा कार्यकाळ इत्यादी बाबीची नोंद असणार आहे. पोलीस स्थानका मध्ये समान पोलीस कर्मचारी याचे बदलीने वाटप करण्यास मदत होणार आहे.सदर ऍप बनवण्यासाठी श्री.मितेश घट्टे पोलीस उप-आयुक्त विशेष शाखा व श्रीमती स्वप्ना गोरे,पोलीस उप-आयुक्त मुख्यालय पुणे शहर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त,श्रीमती.स्वप्ना गोरे यांनी सादरीकरण करून कार्यपध्दती बाबतची माहिती दिली.