pune news : चोरीचा खोटा आरोप करून महिला कामगाराला बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अलका मेकलवार असे युवा पीडित महिला कामगाराचे नाव आहे. संबंधित महिला मगरपट्टा सोसायटीमध्ये काम करीत होती. त्यावेळी तिच्यावर संगीता अरय्र यांनी चोरीचा खोटा आरोप केला. त्यानंतर आलेल्या मगरपट्टा पोलीस चौकीमधील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेला अमानुषपणे मारहाण केली. तसेच अश्लील शब्दात शिवीगाळ सुद्धा केली.
याप्रकरणी संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करावी करा, अशी मागणी युवा सेनेने पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली आहे. गरीब महिलेस योग्य तो न्याय मिळावा, त्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी, पुणे शहर युवासेना शिष्टमंडळकडून मागणी करण्यात आली आहे. युवासेना शहरप्रमुख सनी गवते कोथरूड विधानसभा अधिकारी युवा सेना वैभव दिघे, कसबा विधानसभा अधिकारी शुभम दुगाने, बाबासाहेब कोरे, प्रसाद खुडे उपस्थित होते.