Ashok Chavan Resignation : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील राजकीय भूकंप होणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात आता राजकीय वर्तुळातून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणे आता चव्हाण देखील काँग्रेसवर दावा सांगणार का ? अशा आशयाचे ट्विट माविआच्या नेत्याने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अशो चव्हाण यांनी देखील आपल्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल विचारला असता चव्हाण म्हणाले,”मी माझ्या सर्व काँग्रेस पदांचा देखील राजीनामा दिला आहे.मी अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुढील दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.तसेच मी कधीही काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर मांडलेल्या नाहीत कालपर्यंत मी पक्षासाठी एकनिष्ठतेने काम केलेलं आहे. असंही चव्हाण यावेळी म्हणाले.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. अशा आशयाचं ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आपली ट्विटमध्ये राऊत पुढे म्हणतात,”एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय ? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय ? असा सवाल उपस्थित करत आपल्या देशात काहीही घडू शकते असा टोला देखील राऊतांनी यावेळी लगावला आहे.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक वक्तव्य केले. तसेच “भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी म्हटले.