पुणे – दिवाळी म्हटले, की फटाक्यांची आतषबाजी ही आनंदाची बाब मानली जाते. तरी त्यातून निर्माण होणारे वायूप्रदूषण ही धोक्याची पातळी ओलांडत आहे, ही अत्यंत गंभीर बाब बनली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण हे अत्यंत गंभार पातळी गाठल्याचे दिसून येत आहे.
“भारतीय उष्ण कटिबंधीय विज्ञान संशोधन संस्थे’च्या (आयआयटीएम)च्या “सफर’ विभागाच्या आकडेवारीनुसार फटाक्यांनी यंदाही उच्च वायूप्रदूषण पातळी गाठली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 10 पैकी किमान आठ ठिकाणच्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवर “अत्यंत खराब’ अशी नोंदवली गेली.
पुण्यातील हवेची गुणवत्ता मुंबईच्या तुलनेत “खराब’ पातळीवर होती आणि भोसरी स्टेशनमध्ये पीएम (पर्टिक्युलेट मॅटर) 2.5 पातळी 419 सह सर्वाधिक वायू प्रदूषण नोंदवले गेले. आकडेवारीनुसार, पुण्यातील पीएम 2.5 पातळी 156 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर तर पीएम 10 पातळी 231 मायक्रोग्राम प्रति घनमीटर म्हणून नोंदवली गेली. “सफर’ – “आयआयटीएम’च्या आकडेवारीनुसार, भोसरी भागात पीएम 2.5 पातळी 419 सह सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद झाली आहे.
मायक्रोग्राम प्रति घनमीटर आणि पीएम 10 पातळी 329 मायक्रोग्राम प्रति घनमीटर प्रदूषक पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त म्हणजे 60 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे. खराब हवेच्या गुणवत्तेसह इतर सात भागात देखील पीएम 2.5 पातळी 300 मायक्रोग्राम प्रति घनमीटर पेक्षा जास्त नोंदवली गेली. पीएम 10 पातळी या क्षेत्रातील मानक मर्यादेपेक्षा बऱ्यापैकी जास्त होती.
दरम्यान, कोथरूड आणि कात्रज भागात मध्यम हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आणि या भागातील प्रदूषक पातळी प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असली तरी इतर भागांच्या तुलनेत ती कमी पातळीवर होती.
लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी संपूर्ण शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती. लक्ष्मीपूजनादिवशी 50 टक्के अतिरिक्त फायर रॅकेट उडवण्याचे प्रमाण लक्षात घेता, आम्ही हवेच्या गुणवत्तेच्या मध्यम पातळीबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, धुराचे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त होते. परिणामी, वायू प्रदूषण जास्त होते. त्यामुळे दि. 13 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून शहराने अतिशय खराब हवेची गुणवत्ता अनुभवली.
– बी. एस. मूर्ती, प्रकल्प संचालक, “सफर’-“आयआयटीएम’