पुणे – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात महविकास आघाडी इंडिया फ्रंट यांची सभा झाली. या सभेचे आयोजन पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष, यांसह अन्य पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे संकटमोचक संग्राम थोपटे सभेला गैरहजर –
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस चे तीन टर्म प्रतिनिधित्व करणारे आमदार संग्राम थोपटे या सभेला उपस्थित राहिले नाहीत. मागील काळापासून संग्राम थोपटे हे राज्यातील पक्ष नेतृत्वावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
संग्राम थोपटे यांनी कसबा विधानसभा पोट निवडणूक यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली गेली. त्यात काँग्रेस पक्षाचे रवींद्र धांगेकर विजयी झाले, भाजपाच्या लाटेत त्यांनी आपला विजयी करिश्मा कायम ठेवला आहे.
दरम्यान, नुकतंच बारामती कॉंग्रेसच्यावतीने बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.
मात्र, या मेळाव्याला जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची उनुपस्थिती व त्याचवेळी पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशी झालेल्या आमदार थोपटे यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकाणात एकच खळबळ उडाली होती.