पुणे(प्रतिनिधी) – नॅशनल पोलिस ऍकेडमी हैदराबाद यांच्यावतीने देशभरातील 104 आयपीएस अधिकाऱ्यांचे मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील आयपीएस अधिकारी( उपायुक्त परिमंडळ 1) डॉ. प्रियंका नारनवरे देशात प्रथम आल्या आहेत. तर औरंगबादच्या पोलीस अधिक्षक मोक्षता पाटील पाचव्या आल्या आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आणि ऑस्टेलियन विद्यापीठाच्यावतीने हा प्रोग्रॅम ऑन लाईन पध्दतीने घेण्यात आला होता. महिणाभर चालणाऱ्या या प्रोगॅममध्ये केस स्टडीचाही समावेश होता.
डॉ.नारनवरे यांनी एका आंदोलनासंदर्भातील केस स्टडी मांडली होती. यामध्ये दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशच्या डॉ.ख्याती गर्ग, तीसरा क्रमांक झारखंडच्या एम. तमिलवनन आणी चौथा क्रमांक अरुणा प्रदेशच्या जीमी चरम यांनी पटकावला.
शहरातील पाच परिमंडळांमध्ये डॉ.नारनवरे यांच्या पिंरमंडळ एकची कामगिरी मुद्देमाल हस्तगत करणे, गुन्हयांचा छडा लावणे आणी प्रतिबंधातत्मक कारवाईमध्ये इतर परिमंडळांपेक्षा सरस आहे.