पुणे(प्रतिनिधी) – जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला असून ही धक्कादायक घटना कोंढाव्यातील अनुकूलनगरमध्ये घडली आहे.
कार्तिक जाधव (वय २२) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कार्तिक जाधव आणि सराईताची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपींना असल्यामुळे होता. त्यातुन आज संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपींनी कार्तिकला कोंढाव्यातील अनुकूलनगरमध्ये गाठले.
त्याठिकाणी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपचारासाठी कार्तिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.