चिंबळी -गोलेगाव (ता. खेड) येथील श्री दावलमालिक बाबांच्या उत्साहास शुक्रवारी (दि. 9) प्रारंभ झाला असून शुक्रवारी बैलगाडा शर्यती रंगल्या होत्या. तर शनिवारी (दि. 10) बैलगाडा शर्यतींचा थरार बैलगाडा शर्यतप्रेमींना अनुभवता येणार आहे. असून विजेत्यांवर बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी खेड, हवेली, मावळ, शिरूर तालुक्यातील सुमारे 485 बैलागाडे सहभागी झाले आहेत.
या बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री 10 वाजता छाया खिलारे (बारामतीकर) यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून रविवारी (दि. 11) सकाळी 9 वाजता तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर दुपारी 2 ते 5 कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.