टाइम्स च्या क्रमवारीत पुणे विद्यपीठाची घसरण

पुणे: टाइम्स हायर एज्युकेशनने वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२० ही क्रमवारी जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान ५०१ ते ६०० यागटातील स्थान घसरून ६०१ ते ८०० या गटात आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३०० विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.

बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने देखील आपले २५० ते ३०० या गटातील स्थान गमावले आहे. तर मुंबई विद्यापीठाला एक हजारांपुढील विद्यापीठांच्या गटात स्थान मिळाले आहे.

टाइम्स च्या क्रमवारीमध्ये जगभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था यांना त्यांच्या कामगिरी नुसार गुणांकन देण्यात येते. त्यामध्ये अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर देण्यात येतो. त्याप्रमाणेभारतातील एकूण ५६ विद्यापीठांना या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. परंतु या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत मागील वर्षाच्या तुलनेत घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागीलवर्षी पुणे विद्यापीठाने ५०१ ते ६०० या गटात स्थान मिळवले होते. मात्र यावर्षी २०० गुणांची घसरण होऊन ते ६०१ ते ८०० च्या गटात गेले आहे.

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)