जाणून घ्या ‘मिशन मंगल’ची आतापर्यंतची विक्रमी कमाई

मुंबई – भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचे उड्डाणे घेतल्याचे दिसत आहे. मिशन मंगल चित्रपटाने आतापर्यंत तब्ब्ल 200 कोटींची विक्रमी केली आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, शर्मन जोशी, अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

दरम्यान, चित्रपटाची कमाई सांगणारा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ‘भूषण खिलाडी’ या ट्विटर हँडलवरून कोड्यात टाकणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सर्व भाग सेट झाल्यानंतर अखेरीस चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिसतो. या व्हिडिओला अक्षय कुमार आणि विद्या बालनने उत्तर दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.