खडकवासला : खडकवासला येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच पक्षातील आमदारांचे विश्वासू अशोक मते यांची भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र अशोक मते यांना दिले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,सचिन दांगट पुणे शहर सहकार आघाडी अध्यक्ष, सचिन मोरे खडकवासला विधान सभा अध्यक्ष, अनिल मते पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थित त्यांना पञ देण्यात आले.
माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम केले आहे. सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात ते कायम अग्रेसर आहेत. कोरोनाचे काळात हजारो लोकांना कोरडा शिधा वाटप, औषधे वाटप, परप्रांतीय नागरिकांना मद्दत, पोलीस पासेस व्यवस्था असे अनेक मदतीचे कार्यक्रम तसेच पक्षाचे दिलेले सर्व कार्यक्रम भाजपाचे वतीने घेतले आहेत. समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन अशोक मते यांची यांची ओळख आहे.