पुणे – ‘आयुष्मान भारत’ पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थींनी ऑनलाइन नोंदणी करावी. त्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थीला प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते.
* पाच लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.
*या योजनेत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार समाविष्ट आहे.
*पुणे जिल्ह्यात 57 खासगी व 12 शासकीय अशा एकूण 69 रुग्णालयांचा समावेश आहे.
* https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar या संकेतस्थळावर लाभार्थी यादी उपलब्ध.