आंबेठाण – खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून खेड तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी 19 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी दिली. या निधीतून खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण होणार आहे. या रस्त्यांमुळे चाकण शहरातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार असून तळेगाव-मुंबईला जाण्यासाठी हे रस्ते पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणार आहेत.
औद्योगिक वसाहतीसह दळणवळणासाठी देखील या रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे होते, त्या अनुषंगाने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे या रस्त्यांचे रुंदीकरण होण्याची मागणी खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर व परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. ती मागणी पूर्ण झाली असून लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे.करंजविहिरे ते धामणे फाटा रस्ता करणे 3 कोटी 91 लाख, पाईट ते कोहिंडे फाटा रस्ता करणे 3 कोटी 77 लाख, सांगुर्डी कॅडबरी फॅक्टरी ते कान्हेवाडी फाटा रस्ता करणे 3 कोटी 50 लाख, या कामांना मंजुरी मिळाली आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यबद्दल खेड पंचायत समितीचे माजी सभापती माणिक कदम यांनी आमदार मोहिते पाटील यांचे नागररिकांच्याअतीन्आभार मानले आहेत.
कोये ते पाईट रस्ता प्रस्तावित
किवळे ते कोये रस्ता 3 कोटी 67 लाख या रस्त्याचे काम प्रगती पथावर असून कोये ते पाईट रस्ता 5 कोटी रुपये हा रस्ता प्रस्तावित आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असून या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांच्या सहकार्यातून उपलब्ध झाल्याची माहिती जयसिंग दरेकर यांनी दिली.