इंदापूर ताल्यातील गावभेट दौर्यात शर्मिला पवार यांचे आवाहन
इंदापूर – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उर्वरित राहिलेल्या विकासासाठी व देशाचे संविधान टिकवण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या तुतारी चिन्हावर मत द्या, असे आवाहन शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी, पिपरी, टनू, नरसिंहपूर, गिरवी, ओझरे, गोंदी, लुुमेवाडी, सराटी येथे गाव भेट दौरा शर्मिला पवार यांनी शनिवारी (दि.13) केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, आपचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, वंचितचे जिल्हाध्यक्ष राजकुमार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, समाधान बोडके, शहाजी देवकर, विठ्ठल पवार, हरीदास पवार, विलास शिंदे, दत्तात्रय रास्ते, दत्तात्रय गायकवाड, किरण शिंदे, नेताजी पवार, महादेव ढेहरे, सुरेश खटके, महादेव सूर्यवंशी, विकी खटके यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्मिला पवार म्हणाल्या की, नीरा नदी परिसरातील शेतकर्यांच्या नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी थेट दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच्या खासदार सुप्रिया सुळे हव्या आहेत. प्रत्येक घटकाला मदत करण्याची भूमिका पवारांची आहे. त्यांच्या संस्कारांचे तंतोतंत पालन करण्यासाठी तुतारी फुंकणारा माणूस चिन्हाला समर्थन हवे आहे. ते समर्थन मतदार देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नीरा नदी परिसरातील शेतकर्यांचे व गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी दहा वर्षात मार्गीच लावायला पाहिजे होता; परंतु पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे नीरा नदी गावातून जाऊन देखील शेतीला व जनावरांना उन्हाळ्यात पाणी नाही. हा प्रश्न शरद पवार शरयुच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीनंतर मार्गी लावतील
– अशोक घोगरे, ज्येष्ठ नेते