पिरंगुट – भुगाव (ता. मुळशी) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन माजी आमदार शरद ढमाले आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले.
हिरागार्डन ते माताळवाडी फाटापर्यँत पुणे मनपाच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या सार्वजनिक नळ कोंढाळेचे उद्घाटन झाले, तसेच माऊंटवल्ड साइटच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरण आणि रंगरंगोटी कामाचे उद्घाटन तसेच रामा क्र. ७५३ एफ येथे थरमल व रबर स्ट्रीप्स बसविणे याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नियोजन मंडळाच्या सदस्या भारती विनोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विनायक ठोंबरे, भाजप तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ, सरपंच वैशाली मनोहर सणस, सुवर्णा जोशी, मारुती कुरपे, वसंतराव चोरगे, जीवन साखरे, श्याम धुमाळ, दीपक साठे, राहूल शेडगे, स्वस्तिक चोंधे, दीपक करंजावणे, शिवाजी तांगडे, नारायण करंजावाणे, निवृत्ती शेडगे, जमनादास इंगवले, अजित इंगवले,
विलास चोंधे, रमेश सणस, जितेंद्र इंगवले, अनिल करंजावणे, सतीश इंगवले, लालचंद भिलारे, मनोहर सणस, राम शेडगे, अभिजित शेडगे, नीता गुरव, उपसरपंच दिनेश सुर्वे, वनिता तांगडे, अर्चना सुर्वे, वैशाली महेश सणस, सुरेखा शेडगे, संकेत कांबळे, अमित घारे, योगेश्री शेडगे, सुनीता चोंधे ग्रामसेवक प्रताप माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपसरपंच कालिदास शेडगे यांनी केले. आभार सरपंच वैशाली मनोहर सणस यांनी मानले.