पिंपरी – तुळशीचा विवाह झाला की, विवाहाचे बार उडू लागतात. यंदा अधिक मासामुळे लग्नसराई सुरु झाली आहे. पहिल्या मुहूर्तालाच अनेक जोडपी विवाहबंधनात बांधली गेली. यंदा लग्नाचा मोठा सीझन मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत अर्थात मे आणि जून महिन्यांमध्ये मुहूर्त नाहीत. २०२४ मध्ये एकूण ७७ मुहूर्त असले तरी यंदाची लग्नसराई जुलै महिन्यात थांबेल. तोपर्यंत ६२ विवाह मुहूर्त असतील. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या तुळशी विवाहानंतर पुढील मुहूर्त प्रारंभ होतील.
नुकताच तुळशी विवाह संपन्न झाला असून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच सोने आणि चांदीच्या बाजारभावात मोठी वाढ पहायला मिळत आहे. दरम्यान, रेशीमगाठी जुळून आलेल्या लग्नाळूंसाठी यंदा 77 मुहूर्त असले तरी, पुढील वर्षी 2024 मधील मे आणि जून एकही मुहूर्त नसल्याचे समोर आले आहे.
यंदाच्या वर्षी आणि पुढील डिसेंबरपर्यंत अर्थात डिसेंबर 2023 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत जुळून आलेल्या रेशीमगाठी बांधण्यासाठी अर्थातच लग्नासाठी तब्बल 77 तारखा ग्रह नक्षत्रानुसार शुभ आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये तीन मुहूर्त होते. तर, डिसेंबर २०२३ महिन्यात दहा मुहूर्त आहेत. त्यानंतर, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत विवाहासाठी तब्बल 42 तारखा शुभ आहेत. मात्र, मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. परीक्षा संपूर्ण शाळांना सुट्ट्या असल्याने अनेकजण मे आणि जून महिन्यात मुहूर्त काढतात. मात्र, यंदा मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नसल्याचे त्यापूर्वी किंवा जुलै महिन्यातील मुहूर्त काढावे लागणार आहे. जुलैमध्ये लग्नासाठी सहा मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर 2023 – 27, 28, 29.
डिसेंबर 2023 – 6,7,8, 14, 15, 17, 20, 21, 25, 29.
जानेवारी 2024 – 2, 3, 4, 5, 6, 8, 17, 22, 27, 28, 30, 31.
फेब्रुवारी – 1, 4, 6, 12, 13, 14, 17, 18, 26, 27, 28, 29.
मार्च – 3, 4, 6, 11, 16, 17, 26, 27, 30.
एप्रिल – 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22, 23.
जुलै – 9, 11, 12, 13, 14, 15.
नोव्हेंबर – 17, 23, 26, 27.
डिसेंबर 2024 – 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 26.