भोर : प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या ध्वजसंचलन परेडसाठी राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या एन.सी.सी.च्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, 1988 पासून ही गौरवशाली परंपरा महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाने अविरतपणे जपली आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.
या विद्यार्थ्यांमध्ये लीडिंग कॅडेट प्रज्वल मालुसरे आणि एस.यू.ओ. इश्वरी बांदल यांचा समावेश आहे. परेडसाठी घेण्यात आलेल्या खडतर चाचण्यांच्या गुणवत्तेत हे विद्यार्थी यशस्वी झाले. त्यामुळे त्यांची निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या एन.सी. सी. विभागाचे प्रमुख सब.लेफ्टनंट संदीप उल्हाळकर व लेफ्टनंट डॉ. पल्लवी मळेकर यांनी दिली.
संबंधित विद्यार्थ्यांना 3 महाराष्ट्र नेवल युनिटच्या कमांडिंग ऑफिसर अप्लेश मोहन,आणि महाराष्ट्र गर्लस बटालियनचे प्रमुख कर्नल विपीन मॉल यांनी मार्गदर्शन केले होते.
सदर विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक, अध्यक्ष माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब, कार्याध्यक्ष आमदार संग्रामदादा थोपटे व मानद सचिव सौ.स्वरूपाताई थोपटे यांनी अभिनंदन केले आहे.