Sanjay Dutt : टीव्हीचा लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉल 14 सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. दर आठवड्याला काही सेलिब्रिटी पाहुणे या शोमध्ये सहभागी होतात. यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या शोमध्ये दिसणार आहे. या एपिसोडचा प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये संजू बाबा त्याची दिवंगत आई नर्गिस दत्तची आठवण काढताना दिसत आहे.
प्रोमो व्हिडीओमध्ये संजय दत्तचे अतिशय भव्य पद्धतीने स्वागत होत असल्याचे दिसून येते. यानंतर शोची स्पर्धक अनन्या पाल तिचा परफॉर्मन्स देते. संजय तिच्या आवाजाने वेडा होतो. तो यावेळी म्हणतो,’मला असे वाटते की तुझा आवाज फक्त ऐकत राहावा तुमचा आवाज खुप सुंदर आहे.’
संजय दत्तने शोमध्ये आई नर्गिसची आठवण काढताना एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली,’मी एवढेच सांगू शकतो की, कधी कधी आपण आपल्या आई-वडिलांना गृहीत धरतो, ते नेहमीच आपल्यासाठी असतील.’ यानंतर आई नर्गिस दत्तची आठवण करून देत संजू बाबा म्हणतो, ‘माझ्या आईने मला जे सांगितले ते आता माझ्या मनात येते. तिने मला तिच्यासोबत वेळ घालवायला सांगितले, तिच्यासोबत बसायला सांगितले, कारण ती कधी निघून जाईल हे तिला माहीत नव्हते, आणि मी तिच्यासोबत पुरेसा वेळ घालवला नाही याची मला खंत आहे. आता, मला वाटतं, जर मी आईच ऐकलं असतं आणि दिवसातले काही तास तिच्यासोबत घालवले असते.’ असं म्हणत संजय दत्तने आपल्या भावना व्यक्त केल्या.