आमदार थोपटे आघाडी धर्माचे पालन करणार का?
भोर : लोक सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आसताना बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेवून यृवू घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकि संदर्भात चर्चा केली असल्याचे वृत्त हाती आले असुन या भेटीची भोर मध्ये चांगलीच चर्चा रंगली असुन उलटसुलट चर्चांना ऊधान आले आहे.
राज्यात काँग्रेस , राष्ट्रवादी आणिशिवसेना उद्धव ठाकरे गटाची आघाडी असुन विळ्या भोपळ्याचे वैर असलेल्या राष्ट्रवादिचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंञी अनंतराव थोपटे यांच्यात समझोता होईल का? हा खरा प्रश्न असुन आमदार संग्राम थोपटे आघाडीचा धर्म पाळणार की बदला घेणार या कडे तालुक्याचे लक्ष लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील पंच वाष्पिक निवडणुकी वेळी खासदार सुप्रिया सुळे यांना भोर विधानसभा मतदार चाःलीच धावपळ करावी लागली होती. या वेळी राष्ट्रवादी पक्षातच गटातटाचे राजकारण झाले असुन राज्याचे उप मुख्यमंञी दस्तुर खुद्ध नामदार अजित पवार यांनीच राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकुन भाजपाशी हातमिळवणी केली असल्याने शरद पवार पर्यायाने खासदार सुप्रिया सुळे यांचे धाबे दणानले असुन आता त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय उरलेला नसुन आजच्या आमदार संग्राम थोपटे यांचे भेटीने सिद्ध झाले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रिय मंञी शरदचंद्र पवार यांनी सन १९९ साली काँग्रेस पक्षाशी फारकत घेवून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली.त्या वेळी त्यांनी भोर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करुन माजी मंञी अनंतराव थोपटे यांचा पराभवा केला.त्या वेळी अनंतराव थोपटे हे विधिमंडळाचे अध्यक्ष होते.माञ त्या वेळी पराजय झाल्याने भोरची मुख्यमांञी पदाची संधी हुकल्याचे शल्य थोपटे यांना आजही बोचत असुन सहकार क्षेञातही पवारांनी थोपटे यांना कायमच ञास दिला असला तरी सत्तेच्या राजकारणात थोपटे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदार संघात विजयाची हँटट्रिक साधली असुन बारामती लोकसभा मतदार संघातील खासदारकिच्या निवडाणुकिच्या विजयातही थोपटे यांचा सिंहाचा वाटा असतानाही विधानसभा अध्यक्ष पदाचे निवडीतही आमदार संग्राम थोपटे यांचे नांव आघाडीवार असतानाही त्यांचे नांवाला विरोध कोणी केला हे सांगण्या साठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित पवार यांचे आमदार संग्राम थोपटे यांचेशी मैञीपूर्ण संबंध असल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे.त्या मुळे आज लोकसभेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून जरी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार थोपटे यांची भेट घेतली असली तरी हे विळ्या भोपळ्याचे वैर संणार की चिघळणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हाचा प्रश्न आजतरी न्यालयाच्या कोर्टात असुन अजित पवार यांची भविष्यात काय खेळी खेळणार हा विषयही तितकाच महत्वाचा ठरणार असल्याने बहिण भावाचे युद्ध रंणार की षमणार हा प्रश्न जरी चर्चेत असला तरी खासदार सुळे यांनी माञ अजित पवारांचा चांगलाच धसका घेतल्याचे चिञ आजच्या आमदार थोपटे याःचे भेटीने सिद्ध होत असल्याचे चिञ पहायला मिळत आहे.